Monday, April 25, 2011

दक्षिण गुहागर - दुसरा दिवस

दुस रया दिवसाची सुरुवात परत किलबिलाटाने सुरु झाली, आज न्याहारी साठी मस्त गरम गरम पोहे होते. मस्तच आवडता मराठमोळा पदार्थ. जवळ जवळ ९ वाजता आम्ही कूच केली ते तवसाळ च्या समुद्र किनार् या  कडे. 
तासदीड तासाने आम्ही एका पठारा वर पोचलो तिथून दिसणारा विस्तीर्ण सागर नजरेत मावत नव्हता. खाली सागर किनार् या कडे जाण्याचा रस्ता होता. 
तिथून निघून सुरुच्या बनातून चालत आम्ही सागर तीरा पाशी निघालो वाटेत उंच च्या उंच सुरु वर बसलेली घार दिसली. सुरुच्या छायेत मस्त गारवा जाणवत होता.२ मिनिटात आम्ही किनार्या वर पोचलो.  सुंदर स्वच्छ लोभस सागर लाटां फेसाळत येत होत्या इथे परत मस्त पाय बुडवून फिरलो.सागर किनार् या  च्या एका बाजूला पोलाद निर्माण करणारी जिंदाल लिमिटेड होती तर दुसऱ्या बाजुने जुना विजयगड आपले अस्तित्व टिकवून उभा होता.

पुढे  आम्ही हेदवी गणेश मंदिरात गेलो.शुभ्र संगमरवराची गणेशाची सुबक मूर्ती आणि मंदिराचा गाभारा विलोभानिंय आहे. मंदिराच्या पाठीमागे मंदार वृक्ष आहे . ह्याची फुले गणेशाला फार प्रिय आहेत. जवळच एक छोटे दुकान होते ज्यात चवदार पन्हे मिळत होते. मंदिराच्या परिसरात राताम्ब्याचे वृक्ष आहेत.  इथून १० मिनिटात हेदवी च्या आणखीन एका सागर किनार्या कडे पोचलो. तिथे बामन घळ नावाची निसर्ग निर्मित पोकळी आहे. समुद्रातील उंच लाटां हिच्या निर्मितीला कारणीभूत आहेत. जेंव्हा लाटेचे पाणी ह्या छोट्या पोकळीतून वरती उडते तेंव्हाची मजा औरच. असे म्हणतात कि ह्या घळीमध्ये एक ब्राम्हण पडून मेला होता त्यामुळे हिचे नाव "बामन घळ".

आता पोटात कावळे काव काव करायाल लागले होते म्हणून आम्ही  वेळणेश्वर मंदिराच्या जवळ गोखल्यांच्या कडे जेवण घेतले. लाडू फारच छान होता. एकूणच मर्यादित थाळी प्रकारात मोडणारा प्रकार छान झाला.थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही पालशेत च्या गुहे कडे निघालो.

पालशेत ची गुहा हि एका नदीच्या किनार् या वर नैसर्गिक रित्या तयार झाली आहे. ह्या गुहेत ९०००० वर्ष्यांपूर्वी माणूस वापरत असेलल्या दगडी हत्यारांचे नमुने मिळाले (आता ते सरकारच्या पुरातातव विभाग कडे असतात)  ह्या गुहे चा रस्ता एका ओसाड पठारावरून नदीच्या कोरड्या पत्राकडे जातो. इथे वाटेवरच करवंदाची भरपूर जाळी आहेत. रानमेवा खाण्याचा मोह आवरता नाही आला. 
गुहेकडे जाण्याचा रस्ता फारच खडतर आहे नदीच्या पात्रातले मोठे मोठे दगड पार करत गुहेपाशी पोचता येते. इथून निघायला जवळ जवळ संध्याकाळ झाली होती. सूर्यास्त पाहण्यासाठी परत आकडा सगळेजण गुहागरच्या समुद्र किनार् या कडे गेलो. मला मात्र एका खंड्याने (किंगफिशर)व्याडेश्वराच्या मंदिरापाशीच घुटमळत ठेवले. मी पोचे पर्यंत सूर्य असतास गेला होता काही चौपाटी style फोटो काढून आम्ही परत मुक्कामी परत आलो. 
रात्री मराठ मोळ जेवण ( भात ,आमटी, पोळी भाजी ) जेवून  झोपलो. 

शब्दांकन - कौस्तुभ देशपांडे 
छायाचित्रकार - अक्षय मुळे






No comments:

Post a Comment