Tuesday, February 4, 2014

Polution Free Dombivali

डोंबिवली - गाव ते शहर (प्रगती का अधोगती) डोंबिवली , मुंबई उपनगारापासून जवळ असणारे गाव होते. १९९९ पर्यंत लोकवस्ती अशी जास्ती न्हवतीच. पण दादर , बोरीवली, मालाड , गिरगाव , दहिसर, वसई, ई ठिकाण हून लोक डोंबिवली मध्ये स्थलांतरित होऊ लागले आणि गावाचा प्रवास शहराकडे चालू झाला. विकास नुसता रस्त्यांचा , सोयी शुविधा ह्यांचा नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकाचा झाला. शाळा ,कॉलेजेस, सामाजिक संस्था (ह्या सामाजिक संस्था आज स्वतःची तुंबडी भरण्यात अग्रेसर असतात , प्रमोशनअल इवेन्ट च्या नावा खाली ) पण उदयास आल्या. पण निवास हि संकल्पना गावात छोटेखानी कौलारू घर अशी होती. ती चौकट रुंदावून त्याची बिल्डिंग, कॉमप्लेक्स झालीत. डोंबिवली MIDC मध्ये पण कारखाने बंद पडून नवीन निवासी संकुल आले. वाडे आणि कौलारू घराच्या आसपास असलेली झाडी, फुलबाग , तारेचे सुशोभित कुंपण ( उदा. पणशीकर वाडा, समेळ बंगला, माटे बंगला) ह्या गोष्टीपण सिमेंटच्या जंगलात लुप्त झाल्यात. आणि २००३ पासून डोंबिवली हे "प्रदूषित शहर " अशी नवी ओळख लाभली. (http://www.facebook.com/topic.php?uid=170572606395&topic=12107) डोंबिवली च्या आस पास जवळ जवळ २७गाव आहेत त्यांचा परिसर सुंदर हिरवागार होता. २०१० पर्यंत पण त्या नंतर तिकडे मुंबई पुणे हायवे जवळ असल्याने मुंबईतील बडे बडे बिल्डर आपले हाथ पाय पसरू लागलेत. पर्यावरण रक्षण कर्त्यांचे डोंबिवली ते शीळ रस्त्यावर लक्ष्य नसावे असे वाटते. १९९७ पासून बंद असलेल्या प्रीमिअर कंपनीत असलेल्या गर्द झाडी मध्ये मुंगुस, घार, गिधाड ई. आणि बरेचसे सरपटणारे प्राणी ह्यांचा अधिवास आहे. २०१२ मध्ये झालेल्या हाय कोर्टाच्या निकालाप्रमाणे ती जागा आता शॉपिंग माल साठी देणार आहे म्हणजे तिथे असलेली वन संपदा नष्ट होणार आहे. ह्या गोष्टीनी डोंबिवलीचा विकास होतोय का ऱ्हास ? ते पक्षी , तिथली झाडे , विचारतायत कि कोण आहे का आम्हाला वाचवणारे ? सरकारने हा पूर्ण पत्ता भोपेर पासून ते शीळ , हाजीमलंग पर्यंतचा परिसर ग्रीन झोन जाहीर करून त्यात वनसंपदा , पक्षी विकास, केला पाहिजे. नवीन बिल्डर ला ह्या परिसरात कॉमप्लेकस बांधायाला परवानगी देऊ नये. तरच डोंबिवली मध्ये असलेले प्रदूषण ताब्यात राहायला मदत होईल. शब्दांकन - कौस्तुभ देशपांडे

Indian Talent- How they can help to overcome Dearth

पानी तेरा रंग कैसा सध्या च्या काळात पाणी ही मूलभूत गरज ओलखुन सरकार ने बरेच विकास प्रकल्प राबवले आहेत . धरण बंधाणे अणि त्याची निगा रखाणे हयात सरकारला समन्वय सधता आलेला नाही. असे चित्र सोशल मीडिया दाखवते, हे खरेच आहे की सरकर बरीच कामे पूर्ण करत नाही अणि केली तर त्याची निगा रखत नाही. नुकताच टीवी वर एका न्यूज़ चनॆल वाल्याने दाखवले आहे की महाराष्ट्रात काही मोठ्या धारणा तुन पाणी गळती सुरु आहे . काही जिल्ह्यात पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना सरकारला ली पाणी गळती दिसत नहीं का ? इथे मिडिया वाल्यानी स्वत:हुन काही एक्सपर्ट सिविल इंजिनियर च्या चर्चा किंवा मर्गदर्शन सरकारला केले पाहिजे, अन्यथा असल्या अर्धवट बातम्या दाखवून नयेत . मी विचारतो ह्या सोशल मीडिया वाल्याना आणि भारतातल्या सगळ्या सिविल इंजिनियर मित्राना की आपण ह्या वाया जाणार्या पाण्याचा दुष्काली भागाला उपयोग करता येण्याजोगा मार्ग सुचवावा . जेणे करून सरकार ला पण योग्य पावुल उचलण्याची दिशा मिळेल . नुसत्या आरोप प्रत्यारोपतुंन गरीब जनतेचे हालच होतील . माझ्या संपूर्ण भारतातील सिविल इंजिनियर मित्रानी आपणहून पुढे येउन आपले मत मांडावे . नोट :- हा लेख मी सामाजिक जबाबदारि ओळ्खुन लिहिला आहे . ह्या लेखाचा कुठल्याही राजकीय पक्ष्याशी संबंध नाही .

satyanarayan katha

सत्यनारायण कथा अलीकडेच एका वृत्तपत्रातून वाचनात आलेल्या सत्यानारायणा च्या कथे विषयी ले लिहिले होते त्या लेखा वर लिहावासे वाटले म्हणून लिहितोय. प्रस्तुत लेखका इतका मी मोठाही नाही आणि माझा अनुभवही नाही . एकुणच तय लेखात आलेला मजकुर " नविन पिढीचा सत्य नारायण कथे कड़े पहाण्याचा दृष्टिकोन , आणि कथा म्हणजे सत्य नारायणा ची जाहिरात आहे." असा होता असो , सत्यनारायण हे व्रत आहे. ते कसे पूर्ण करावे अणि त्याची फलश्रुती काय आहे,हे त्या कथे मधून श्रोत्याना मिळत असते . जाहिरात ही कुठल्याही चांगल्या गोष्टीची करावी लागत नाही . ती हॊत असते . वैदिक कालपासून मुखप्रचार हे माध्यम जाहिरातीं साठी वापरले जात होते . त्याचेच ही कथा म्हणजे उत्तम उदहारण आहे. कथा श्रवण केल्याने कानाला चांगले ऎइकण्य़ाचि सवय लगाते . ह्या धकाधकीच्या जीवनात मन स्थिर नसते ते स्थिर करण्याचा थोडा प्रयत्न ही कथा करत आलेली आहे. जसे संगीतातील ज्ञान गुरु वर श्रद्धा ठेवून पुढे संक्रमित होते. त्याच प्रमाणे ही कथा प्रत्येक पिढी ला आदर्श् च आहे. इथे श्रद्धा असणे हे महत्वाचे आहे . इश्वर तत्व सगळ्या चराचरात आहे असे मानले तर तो अलीकडच्या mobile , iphone , ipad इत्यादि गोष्टिन्मधे पण आहेच . ह्या मॉडर्न पिढी मधे पण सत्यानारायणाच्या कथे बद्दल श्रद्धा आहेच . पावित्र्य आणि साक्षात्कार ह्या गोष्टी जुन्या पिढी पेक्ष्या कमी असतील कदाचित पण श्रद्धा अली की त्यात सर्व विरघ ळु न जाते. जे काही अत्ता ह्या घडीला चालू अहे ही त्याचीच इच्छा आहे. नविन शोध लगणया ( मोबाइल, लैपटॉप , आईपॉड ,ipad इत्यादि )पासून ते त्याचा वापर कुणी कसा करावा इथपर्यंत . श्रद्धा आणि संस्कार ह्याचे महत्त्व प्रत्येक पिढीला कळावे म्हणून संत महात्मे इथे जन्माला आले . उदाहरानादाखाल स्वामी विवेकानंद - इन्ग्रंजच्या अधिपत्याखाली सगळा देश भारतीय परंपरा विसरत होता . त्याचा पुन:प्रचार करण्याचे मोठे कार्य त्यानी केले. तरुण पिढितिल सगळे जण उत्तम संस्कारित राहतील ह्याची काळजी घेतली . laptop , mobile मुळे जरी जुन्य पिढितिल लोकाना सत्यनारयणाच्या पूजेत वातावरण निर्मिती चा आभाव भासला तरी , साधकाची श्रद्धा इश्वारापर्यंत पोचलेली असते . समाप्त .

Monday, April 25, 2011

शेवटचा दिस गोड व्हावा - Final day of the tour

"शेवटचा दिस गोड व्हावा " आणि तो तसा झालाही.सकाळी  गरम  गरम तांदळाच्या  पिठाची दिरडी खावून आम्ही थोडीफार खरेदी उरकून ९ पर्यंत गुहागरला bye   bye केला. आज ची सकाळ मळभ घेऊन आली होती . मला भिम पालासिमाधली एक बंदिश आठवली " सावन कि ऋत आई सखी री ". 
बर्याच प्रवासानंतर आम्ही डेरवण ला ( चिपळूण ) पोचलो बस मधला मोठा प्रवास गाण्यांनी , विनोदांनी भरून टाकला. डेरवण मध्ये श्री वालावलकर ह्यांनी  शिव सृष्टीची निर्मिती  केली आहे. ह्यात जवळ जवळ १०० एक , मोठे मोठे घोडेस्वार , भाले  घेतलेले मराठा सैनिक उभे आहेत. प्रवेशद्वारावर २ हत्ती स्वागताला अंबरी सहित उभे होते. आत प्रवेश केल्यावर सभामंडपात श्री छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक बारीक प्रसंग 3d शैली मध्ये कोरलेले आहेत. सभा मंडपाच्या मध्यभागी एक मोठे लोलकाचे झुंबर आहे. 

ह्या शिव सृष्टीच्या मागेच श्री टेंबे स्वामीचा मठ आहे. मठात महिलांना साडी आणि पुरुषांना पूर्ण भारतीय पोशाख असल्याशिवाय आत सोडत नाहीत.इथल्या उपहारगृहात थोडी पोटपूजा करून आम्ही देवी विन्ध्यावासिनीच्या दर्शनासाठी कूच केली. मंदिरातली मूर्ती फारच ८०० वर्षे जुनी असून तिच्या बरोबर कार्तिकेयाची पण मूर्ती आहे. 

कार्तिकेयाचे दर्शन महिलांना निषिद्ध असले तरी इथे विनंती  केल्यास कार्तीकेयांचे दर्शन होऊ शकते. 
दर्शन घेऊन आम्ही गोवाल गड कडे निघालो. ह्या गडाच्या पायथ्याशी करंजे श्वरी  देवीचे मंदिर आहे मंदिराच्या मुख्य गाभार्यात ला देवीचा लाकडी देव्हारा फारच सुबक आहे. 

ह्या मंदिराच्या पुढून गोवाल गडावर चढण्याचा मार्ग आहे, डोंगरात कोरलेल्या पाय र्या आहेत. वर चढून गेल असता मागे दिसणारी वशिष्टी नदी आणि तिच्या पत्रातून घराकडे परतणाऱ्या कोळी लोकांच्या होड्या हे दृष्य वीलोभानीय दिसते. परत उतरून आम्ही दुपारचे जेवण घेण्या साठी  एका हॉटेल वर थांबलो पण शुद्ध शाकाहारी भोजन शोधण्यासाठी थोडे जास्त कष्ट पडले. पण एकदाचे हॉटेल विरंगुळा मिळाले. इथे तर अवीट गोडीची पानीर  कोल्हापुरी , पनीर पालक आणि ७२ वर्ष्याच्या आजीनी केलेल्या गरम गरम पोळ्या आणि वर ताजे ताजे ताक ह्यांनी आमचा आत्माराम तृप्त झाला. 

इथे ह्या नर्सरी मध्ये कृष्णकमळ पाहायला  मिळाले ( लाल, जांभळ्या रंगाची २ फुले देणारे २ वेल होते.) 
संध्याकाळी आम्ही महाड च्या जवळ चहा पान करण्यासाठी उतरलो त्या ढाब्याच्या मागे सुंदर सूर्यास्ता चा देखावा होता. तिथे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाबरोबर उभारून येणारे मावळतीचे रंग आम्ही आमच्या कॅमेर्यात टिपून घेतलेत.

कशेळी घाटा पासून पोलादपूर फाट्यापर्यंत रस्ते वळवाच्या पावसाची पावती देत होते. मृद गंध मनाला वेड लावत होता. कडू गोड आठवणीची साठवण गंधा बरोबर घरापर्यंत पोचली. 

प्रवास सुखरूप करणाऱ्या आमच्या गाडीवान दादांचे आभार. आमच्या ग्रुप लीडर चे पण कौतुक  करावे तितके थोडेच आहे.त्यांना धन्यवाद.


समाप्त :-
शब्दांकन - कौस्तुभ देशपांडे

दक्षिण गुहागर - दुसरा दिवस

दुस रया दिवसाची सुरुवात परत किलबिलाटाने सुरु झाली, आज न्याहारी साठी मस्त गरम गरम पोहे होते. मस्तच आवडता मराठमोळा पदार्थ. जवळ जवळ ९ वाजता आम्ही कूच केली ते तवसाळ च्या समुद्र किनार् या  कडे. 
तासदीड तासाने आम्ही एका पठारा वर पोचलो तिथून दिसणारा विस्तीर्ण सागर नजरेत मावत नव्हता. खाली सागर किनार् या कडे जाण्याचा रस्ता होता. 
तिथून निघून सुरुच्या बनातून चालत आम्ही सागर तीरा पाशी निघालो वाटेत उंच च्या उंच सुरु वर बसलेली घार दिसली. सुरुच्या छायेत मस्त गारवा जाणवत होता.२ मिनिटात आम्ही किनार्या वर पोचलो.  सुंदर स्वच्छ लोभस सागर लाटां फेसाळत येत होत्या इथे परत मस्त पाय बुडवून फिरलो.सागर किनार् या  च्या एका बाजूला पोलाद निर्माण करणारी जिंदाल लिमिटेड होती तर दुसऱ्या बाजुने जुना विजयगड आपले अस्तित्व टिकवून उभा होता.

पुढे  आम्ही हेदवी गणेश मंदिरात गेलो.शुभ्र संगमरवराची गणेशाची सुबक मूर्ती आणि मंदिराचा गाभारा विलोभानिंय आहे. मंदिराच्या पाठीमागे मंदार वृक्ष आहे . ह्याची फुले गणेशाला फार प्रिय आहेत. जवळच एक छोटे दुकान होते ज्यात चवदार पन्हे मिळत होते. मंदिराच्या परिसरात राताम्ब्याचे वृक्ष आहेत.  इथून १० मिनिटात हेदवी च्या आणखीन एका सागर किनार्या कडे पोचलो. तिथे बामन घळ नावाची निसर्ग निर्मित पोकळी आहे. समुद्रातील उंच लाटां हिच्या निर्मितीला कारणीभूत आहेत. जेंव्हा लाटेचे पाणी ह्या छोट्या पोकळीतून वरती उडते तेंव्हाची मजा औरच. असे म्हणतात कि ह्या घळीमध्ये एक ब्राम्हण पडून मेला होता त्यामुळे हिचे नाव "बामन घळ".

आता पोटात कावळे काव काव करायाल लागले होते म्हणून आम्ही  वेळणेश्वर मंदिराच्या जवळ गोखल्यांच्या कडे जेवण घेतले. लाडू फारच छान होता. एकूणच मर्यादित थाळी प्रकारात मोडणारा प्रकार छान झाला.थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही पालशेत च्या गुहे कडे निघालो.

पालशेत ची गुहा हि एका नदीच्या किनार् या वर नैसर्गिक रित्या तयार झाली आहे. ह्या गुहेत ९०००० वर्ष्यांपूर्वी माणूस वापरत असेलल्या दगडी हत्यारांचे नमुने मिळाले (आता ते सरकारच्या पुरातातव विभाग कडे असतात)  ह्या गुहे चा रस्ता एका ओसाड पठारावरून नदीच्या कोरड्या पत्राकडे जातो. इथे वाटेवरच करवंदाची भरपूर जाळी आहेत. रानमेवा खाण्याचा मोह आवरता नाही आला. 
गुहेकडे जाण्याचा रस्ता फारच खडतर आहे नदीच्या पात्रातले मोठे मोठे दगड पार करत गुहेपाशी पोचता येते. इथून निघायला जवळ जवळ संध्याकाळ झाली होती. सूर्यास्त पाहण्यासाठी परत आकडा सगळेजण गुहागरच्या समुद्र किनार् या कडे गेलो. मला मात्र एका खंड्याने (किंगफिशर)व्याडेश्वराच्या मंदिरापाशीच घुटमळत ठेवले. मी पोचे पर्यंत सूर्य असतास गेला होता काही चौपाटी style फोटो काढून आम्ही परत मुक्कामी परत आलो. 
रात्री मराठ मोळ जेवण ( भात ,आमटी, पोळी भाजी ) जेवून  झोपलो. 

शब्दांकन - कौस्तुभ देशपांडे 
छायाचित्रकार - अक्षय मुळे






सुरुवात - पहिला दिवस

" आवडतो मज अफाट सागर , 
अथांग पाणी निळे, 
निळ्या जांभळ्या जळात केसर, 
सायंकाळी मिळे,
फेस फुलांचे सफेद शिंपित , 
वाटेवरती सडे ,  
हजार लाटा नाचत येती , 
गात किनार् या कडे. " 
आमच्या लहानपणी सहावीत असलेल्या  "सागर" ह्या  कुसुमाग्रजांच्या  कवितेचे यथार्थ दर्शन घडवणारा निळाशार समुद्र , स्वच्छ सुंदर किनारे लाभलेले गुहागर ( कोकण) डोळ्यात साठवून मन बस च्या पण वेगाने धावत होते. 
पाखरांच्या किलबिलाटाने सकाळी जाग येणे मुंबईत जेवढे दुरापास्त तेवढेच इकडे सर्रास. त्यात बुलबुलचा आवाज , सुतार पक्ष्याचा आवाज आणि ह्यात मिसळणारा हूप हूप असा भारद्वाजाचा आवाज सकाळ अगदी प्रसन्न करत होते. त्यांची निवास व्यवस्थाच मुली अजब होती. काही जण मोठ्या जुन्या आंब्याच्या झाडावर , तर काही जण परसातल्या केळीवर , फणसाच्या झाडावर अगदीच काही चिमण्या आणि बुलबुल मधूनच जांब च्या झाडावर चक्कर मारत होते. अशी हिरवीगार सकाळ आत्तापर्यंत ऐकून ,वाचून होतो ती " याची देही याची डोळा " अनुभवताना एक चेतना रोमरोमात उभारून येत होती. याला हल्लीच्या भाषेत "मस्ती" म्हणतात. 
clicked from 2nd floor - House - Mr Khare

मुंबईतले पुढचे घाई गर्दीचे दिवस सुखात जावेत म्हणून आम्ही सगळेच ह्या मोकळ्या हवेचा श्वास निसर्गातून भरून घेत होतो.

युथ होस्टेल ने आयोजित केलेल्या आमच्या छोट्या सुट्टीची सुरुवात ठाणे ते गुहागर बस प्रवासाने झाली. कोकणातल्या चिंचोळ्या, नागमोडी रस्त्यांवरून धावणाऱ्या छोट्या बस मध्ये पाठ टेकायला जरी त्रास झाला तरी प्रसन्न सकाळ अनुभवून श्रम परिहार झाला. दोन्ही बस मिळून आम्ही ४०-४५ जण होतो. 
चहा पान आणि जेवण खाण जोशी काकून कडे होते. थोडा वेळ आराम करून गरम गरम उपमा खावून , चहा पिवून आम्ही समुद्राचे दर्शन घेण्य साठी पारस दारातून  निघालो. पुढे लावलेल्या जास्वंदी , तगर , मोगरा , जायफळ, माड, पोफळीच्या वाडी ने आमचे स्वागत केले.मधूनच खोल खोल असलेल्या विहिरी दिसत होत्या.
झाडीतून बाहेर येऊन पहिले असता समोर पसरलेला विशाल सागर आणि समुद्राची शुभ्र रेती , जसे जसे पुढे जाऊ तसे तसे रेतीतून बाहेर येणारे छोटे छोटे खेकडे माणसाना पाहून परत त्यांच्या मातीच्या घरात धावत होते.हौस पूर्ण होई पर्यंत पाण्यात डुबक्या मारल्या जात होत्या. किनार् या वरून दिसणारे निसर्गाचे दृश्य मी कॅमेरात कैद करून घेतले होते. परत येताने जवळचेच दुर्गा देवी चे मंदिर पहिले कोकणातल्या मंदिराचा रंग वर्ष्यानुवरशे टिकतो कारण प्रत्येक सण वारानुसार त्याला रंगाचा नवीन हाथ मारला जातो. मंदिराच्या आवारात लावलेली काही रंगीत फुले पाहून समाधान वाटले.  

जोशी काकून कडचे दुपारचे जेवण फारच सुंदर होते. त्यांच्या आग्रहाने जेवणाची गोडी आणखीन वाढली होती. साखर आंबा , कैरीची चटणी , ताक, गरम गरम पोळी भाजी, नारळाच्या दुधात बनवलेली कैरीची कढी, इतक खावून तृप्त ढेकर देत आम्ही थोडे विसावलो.तीन दिवसाच्या जोशी काकूंच्या आग्रहाला सलाम.  

अर्ध्यातासाच्या विश्रांती नंतर आमचा लवाजमा गोपाल गडावरच्या वरच्या  स्वारी साठी सज्ज झाला. गुहागरच्या उत्तरेला असलेला हा किल्ला आणि ह्याचे दगडी बुरुज आपली ओळख  टिकवून उभे आहेत. सागर तटाचे मनोहारी दृश्य ह्याच्या दोन्ही बाजूनी दिसते. पण हा किल्ला सरकार खजिन्यात नसून एका खासगी मालका कडे आहे. किल्ल्याच्या आत १ मोठी पाण्याची टाकी आहे . किल्ल्याकडे कूच करताना वाटेत दाभोळ वीज प्रकल्प दिसतो (एनर्ओंन). 
भ्रष्ट राजकारणात भारतच्या विकासाचाही काना कसा मोडतो ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
नंतर आमचा मोर्चा अंजनवेल मधल्या ताकालेश्वर लाईट हाउस  पाशी आला. हे लाईट हाउस उंच डोंगराच्या कडेला उंच चबुतरया वर बांधलेले आहे. ह्याच्या रचने मध्ये १० प्रिझम चे वर्तुळाकार तुकडे आहेत ज्यांच्या मुळे रात्रीच्या वेळी समुद्रातील जहाजांना दिशा दाखवता येते (सिग्नल देता येतो) . भौतिक शास्त्रातील "प्रकाशाचे परिवर्तन " हा सिद्धांत ह्या यंत्रासाठी वापरला आहे. भारत सरकारने दर ३० कि मी सागर तीरावर असे लाईट हाउस प्रस्थापित केले आहेत.

"माणूस जर एकलकोंडा  झाला तर त्याला जमावाची भीती वाटायला लागते आणि मग तो उद्धट वर्तन करतो "ह्याची प्रचीती इथल्या मशीन चालवणाऱ्या व्यक्ती वरून आली.
पहिल्या दिवसाचा आमच्या प्रवासातील शेवटचा टप्पा म्हणजे धोपाव जेट्टी मार्गे दाभोळ च्या चंडिका मातेचे दर्शन. बच्चे कंपनीला प्रमुख आकर्षण होते ते फेरी बोट मधून प्रवास. जेट्टी च्या आसपास सार्वजनिक शौचालय हा प्रकार न्हवता. पर्यटन विकास मंत्रालयाला बहुतेक ते बांधण्यात काही रस नसावा किंवा पर्यटकांची गैरसोय त्यांची आवड असावी.(ह्याला कोकणचा विकास म्हणतात)
जेट्टी पर्यंत बस ने आल्यावर पुढे बस सकट सगळे जण फेरी बोट मध्ये बसलो. फेरी बोट च्या अर्ध्याभागात वाहन तळ असतो तर निम्म्या भागात दुमजली प्रवासी असने असतात. ७- ९ मिनिटाच्या प्रवासात पण आईस क्रीम विक्रेते आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेते होतेच. पलीकडे परत डोंगराळ भागातून बस ने प्रवास करून एकदाचे आम्ही एका मंदिरा पुढे उतरलो . मंदिराचे छप्पर पत्र्याचे होते.आत गेल्यावर सभागृह होते. आणि पुढे एक गुहा होती त्यात चंडिका मातेची स्वयंभू मूर्ती होती. संध्याकाळच्या समयांच्या प्रकाशात मूर्ती तेजस्वी भासत होती. दर्शन घेऊन मूर्तीच्या मागून बाहेर येता  येते. गुहेची उंची कमी असल्याने वाकूनच जावे लागते. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी बऱ्याच नवसाच्या घंटा बांधलेल्या होत्या. परत फेरी बोट करून गुहागरला परतलो. रात्रीचे जेवण करून झाल्यावर निद्रा देवीच्या केव्हा अधीन झालो ते कळलेच नाही.

शब्दांकन - कौस्तुभ देशपांडे
     छायाचित्रकार - कौस्तुभ देशपांडे