Monday, April 25, 2011

शेवटचा दिस गोड व्हावा - Final day of the tour

"शेवटचा दिस गोड व्हावा " आणि तो तसा झालाही.सकाळी  गरम  गरम तांदळाच्या  पिठाची दिरडी खावून आम्ही थोडीफार खरेदी उरकून ९ पर्यंत गुहागरला bye   bye केला. आज ची सकाळ मळभ घेऊन आली होती . मला भिम पालासिमाधली एक बंदिश आठवली " सावन कि ऋत आई सखी री ". 
बर्याच प्रवासानंतर आम्ही डेरवण ला ( चिपळूण ) पोचलो बस मधला मोठा प्रवास गाण्यांनी , विनोदांनी भरून टाकला. डेरवण मध्ये श्री वालावलकर ह्यांनी  शिव सृष्टीची निर्मिती  केली आहे. ह्यात जवळ जवळ १०० एक , मोठे मोठे घोडेस्वार , भाले  घेतलेले मराठा सैनिक उभे आहेत. प्रवेशद्वारावर २ हत्ती स्वागताला अंबरी सहित उभे होते. आत प्रवेश केल्यावर सभामंडपात श्री छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक बारीक प्रसंग 3d शैली मध्ये कोरलेले आहेत. सभा मंडपाच्या मध्यभागी एक मोठे लोलकाचे झुंबर आहे. 

ह्या शिव सृष्टीच्या मागेच श्री टेंबे स्वामीचा मठ आहे. मठात महिलांना साडी आणि पुरुषांना पूर्ण भारतीय पोशाख असल्याशिवाय आत सोडत नाहीत.इथल्या उपहारगृहात थोडी पोटपूजा करून आम्ही देवी विन्ध्यावासिनीच्या दर्शनासाठी कूच केली. मंदिरातली मूर्ती फारच ८०० वर्षे जुनी असून तिच्या बरोबर कार्तिकेयाची पण मूर्ती आहे. 

कार्तिकेयाचे दर्शन महिलांना निषिद्ध असले तरी इथे विनंती  केल्यास कार्तीकेयांचे दर्शन होऊ शकते. 
दर्शन घेऊन आम्ही गोवाल गड कडे निघालो. ह्या गडाच्या पायथ्याशी करंजे श्वरी  देवीचे मंदिर आहे मंदिराच्या मुख्य गाभार्यात ला देवीचा लाकडी देव्हारा फारच सुबक आहे. 

ह्या मंदिराच्या पुढून गोवाल गडावर चढण्याचा मार्ग आहे, डोंगरात कोरलेल्या पाय र्या आहेत. वर चढून गेल असता मागे दिसणारी वशिष्टी नदी आणि तिच्या पत्रातून घराकडे परतणाऱ्या कोळी लोकांच्या होड्या हे दृष्य वीलोभानीय दिसते. परत उतरून आम्ही दुपारचे जेवण घेण्या साठी  एका हॉटेल वर थांबलो पण शुद्ध शाकाहारी भोजन शोधण्यासाठी थोडे जास्त कष्ट पडले. पण एकदाचे हॉटेल विरंगुळा मिळाले. इथे तर अवीट गोडीची पानीर  कोल्हापुरी , पनीर पालक आणि ७२ वर्ष्याच्या आजीनी केलेल्या गरम गरम पोळ्या आणि वर ताजे ताजे ताक ह्यांनी आमचा आत्माराम तृप्त झाला. 

इथे ह्या नर्सरी मध्ये कृष्णकमळ पाहायला  मिळाले ( लाल, जांभळ्या रंगाची २ फुले देणारे २ वेल होते.) 
संध्याकाळी आम्ही महाड च्या जवळ चहा पान करण्यासाठी उतरलो त्या ढाब्याच्या मागे सुंदर सूर्यास्ता चा देखावा होता. तिथे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाबरोबर उभारून येणारे मावळतीचे रंग आम्ही आमच्या कॅमेर्यात टिपून घेतलेत.

कशेळी घाटा पासून पोलादपूर फाट्यापर्यंत रस्ते वळवाच्या पावसाची पावती देत होते. मृद गंध मनाला वेड लावत होता. कडू गोड आठवणीची साठवण गंधा बरोबर घरापर्यंत पोचली. 

प्रवास सुखरूप करणाऱ्या आमच्या गाडीवान दादांचे आभार. आमच्या ग्रुप लीडर चे पण कौतुक  करावे तितके थोडेच आहे.त्यांना धन्यवाद.


समाप्त :-
शब्दांकन - कौस्तुभ देशपांडे

2 comments: